इंदापुरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक; घटनास्थळी नेमकं काय घडलं?

इंदापुरमध्ये विचित्र प्रकार घडला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक झाली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 9, 2023, 06:27 PM IST
इंदापुरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक; घटनास्थळी नेमकं काय घडलं? title=

Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापुरमध्ये चप्पलफेक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून चप्पलफेक झाल्याचा दावा केला जात आहे. पडाळकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोठा खुलासा केला आहे. नेमकं काय घडलं याबाबत पडळकर यांनी सविस्तर सांगितले आहे. 

गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. इंदापुरात घडलेल्या प्रकाराची जोरदार चर्चा होत आहे.   सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून चप्पलफेक झाल्याची चर्चा आहे.  इंदापूर प्रशासकीय भवनासमोर शिवधर्म फाऊंडेशनच्या दिपक काटे हे दुध दर वाढीच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत.  पडळकर उपोषणकर्त्या शेतक-यांच्या भेटीसाठी आले होते.   या ठिकाणी भेट द्यायला गेलेल्या गोपिचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेक झाल्याची माहिती समोर येत आहे.  सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चप्पल फेक केल्याची माहिती समोर येतेय. कारण, पडळकर येथे शेतकऱ्यांना भेटून गेल्यानंतर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

पडळाकर यांचा खुलासा

इंदापुरमध्ये चप्पलफेक झाल्याचे वृत्त गोपीचंद पडळकर यांनी फेटाळले आहे. असं काही घडलं नसल्याचे पडाळकर म्हणाले. मी तेथून गेल्यानंतर घोषणाबाजी झाली की काय झाले ते मला माहित नाही असा खुलासा पडाळकर यांनी केला आहे. 

इंदापुरमध्ये भुजबळ यांचा जरांगे यांच्यावर हल्लाबोल

जरांगे अकलेनं दिव्यांग झालाय, अशी टीका भुजबळांनी केलीय. तसंच दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल, असा इशाराही भुजबळांनी जरांगेंना दिलाय. इंदापुरात भुजबळांनी ओबीसी मेळाव्याला संबोधित केलं. या मेळाव्यात भुजबळांनी जरांगेंची नक्कल केली. नारायण कुचे यांच्या व्यंगावर बोलणारा जरांगे अकलेनं दिव्यांग झालाय, असं भुजबळ म्हणाले. हर्षवर्धन पाटील आणि विजयदादा मोहिते पाटील, तुम्ही कुणबी सर्टिफिकिट घेणार का, असा सवालही भुजबळांनी केला.