लग्नास नकार दिल्याने मुलीला जिवंत जाळले

लग्नास नकार दिल्याने ऊसतोड कामगारांच्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा गावात घडला. 

Updated: Dec 30, 2017, 08:56 AM IST
लग्नास नकार दिल्याने मुलीला जिवंत जाळले title=

बीड : लग्नास नकार दिल्याने ऊसतोड कामगारांच्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा गावात घडला. 

दुर्घटनेत मुलगी ८० टक्के भाजली

या घटनेत मुलगी ८० टक्के भाजली असून मृत्यूशी झुंज देत आहे. सदर घटनेप्रकरणी पोलिसांनी महादेव घाडगे, कविता घाडगे, बबन मस्के आणि सुवर्णा मस्के या चौघांना ताब्यात घेतलंय. 

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलीवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलीचं कुटुंब ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेलंय.