एका बुक्कीत दात पाडला; बोरिवली स्टेशनवर तरुणीची रेल्वे टीसीला मारहाण

बोरिवली रेल्वे स्थानकात अत्यंत विचित्र घटना घडली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका तरुणीने रेल्वे टीसीला मारहाण केली आहे. 

Updated: Nov 27, 2023, 09:26 PM IST
एका बुक्कीत दात पाडला; बोरिवली स्टेशनवर तरुणीची रेल्वे टीसीला मारहाण title=

Mumbai Crime News : विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे टीसीं मार्फत कारवाई केली जाते. काही प्रवासी कारवाई विरोध करत रेल्वे टीसीसोबत हुज्जत घालतात. कधी कधी प्रवासी आणि टीसी यांच्यातील वाद विकोपाला जातो. पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली स्टेशनवर (Borivali Railway) अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका प्रवासी तरुणीने रेल्वे टीसीला मारहाण केली आहे. यात रेल्वे टीसीचा दात पडला असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे रेल्वे टीसी आक्रमक झाले असून सुरक्षा पुरवण्याची मागणी करत आहेत. 

राहुल शर्मा जखमी टीसीचे नाव आहे. NCMIndia Council For Men Affairs नावाच्या X अकाऊंटवरुन या घचनेची माहिती देण्यात पोस्ट करण्यात आली. तसेच जखमी टीसीचा फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. शनिवारी ही घटना घडली आहे. मात्र, NCM च्या पोस्टमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. 

नेमकं काय घडलं?

राहुल शर्मा हे बोरीवली रेल्वे स्थानकात ड्युटीवर होते. यावेळी राहुल शर्मा यांनी एका तरुणीला अडवले. शर्मा यांनी तरुणीकडे तिकीट मागितले. मात्र, तिच्याकडे तिकीट नव्हती. शर्मा यांनी विना तिकीट प्रवास करणाऱ्या या तरुणीला दंड भरण्यास सांगितले. उलट या तरुणीने शर्मा यांच्यासह हुज्जत घातली. या तरुणीसह असलेल्या तिच्या मित्रांनी आणि तिने शर्मा यांना मारहाण केली. शर्मा यांच्या नाकाला गंभीर दुखपत झाली. शर्मा यांच्या नाकातून रक्त आले.  तरुणीसह असलेल्या तिच्या मित्रांनी शर्मा यांना बुक्की मारली. यामुळे शर्मा यांचा दात पडल्याचीही माहिती समोर येत आहे.

शर्मा यांच्या मदतीला कुणीही धावून आले नाही. शर्मा यांना मारहाण होत असताना त्यांनी रेल्वे जीआरपीकडे मदत मागितली. तसेच मारहाण करणारी तरुणी आणि तिच्या मित्रांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, रेल्वे जीआरपी यांनी या तरुणीवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे. यामुळे ड्युटीवर तैनात असलेल्या रेल्वे टीसींना सुरक्षा द्यावी अशी मागणी शर्मा यांनी केली आहे.