मच्छिमाराच्या हाती लागला 5 लाख 50 हजारांचा मासा

मच्छिमाराला लखपती करणारा मासा

Updated: Aug 7, 2018, 10:49 AM IST
मच्छिमाराच्या हाती लागला 5 लाख 50 हजारांचा मासा title=

पालघर : पालघर जिल्ह्यातील मुरबे इथल्या एका मच्छिमाराच्या जाळ्यात सापडलेल्या घोळ माशाच्या 720 ग्रॅमच्या बोथाला व्यापाऱ्याने 5 लाख 50 हजारांचा भाव दिला आहे. आतापर्यंतचा हा उच्चांक समजला जात आहे. मासळीपेक्षा त्यांच्या पोटातील बोथाला खूप चांगला भाव व्यापाऱ्यांकडून दिला जातो. वाम, कोत, शिंगाळा या माशाच्या बोथालाही चांगली मागणी आहे. घोळ माशाच्या मांसाला 800 ते एक हजार रुपये प्रति किलो दर मिळत असला, तरी नर जातीच्या बोथाला सर्वाधिक मागणी आहे.

भारतात उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड या राज्यातून माशांच्या बोथाला भरपूर मागणी असते. माशांच्या बोथाचा वापर हे नैसर्गिक सौंदर्यप्रसाधने बनविण्यासाठी, स्त्रक्रियेदरम्यान टाके लावण्यासाठी आणि औषधे बनविण्यासाठी देखील होत असतो.