LPG Cylinder Blast : रत्नागिरीत सिलिंडरचा स्फोट, दोन महिलांचा होरपळून मृत्यू

Cylinder Blast : सिलिंडरचा स्फोट होऊन दोन महिलांचा मृत्यू झाला. सिलिंडरच्या स्फोटानंतर घराला मोठी आग लागली. या आगीत अडकलेल्या महिलांना मृत्यू झाला. ( Maharashtra News in Marathi)  

Updated: Jan 18, 2023, 11:02 AM IST
LPG Cylinder Blast : रत्नागिरीत सिलिंडरचा स्फोट, दोन महिलांचा होरपळून मृत्यू title=
Gas Cylinder Blast In Ratnagiri

Gas Cylinder Blast : रत्नागिरीतील शेट्येनगर येथे सिलिंडरचा स्फोट होऊन दोन महिलांचा मृत्यू झाला. सिलिंडरच्या स्फोटानंतर स्लॅबखाली या दोन्ही महिला अडकल्या होत्या. तब्बल तीन तास या महिला स्लॅबखाली अडकल्या होत्या. (Gas Cylinder Blast In Ratnagiri) रत्नागिरीच्या शेट्येनगरमध्ये पहाटे 5 वाजता ही घटना घडली. त्यात दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. ( Maharashtra News in Marathi) दरम्यान, अश्फाक काझी पहाडे पाचच्या सुमारा घरी आले आणि त्यांनी लाईट लावली. त्यानंतरच स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.

पहाटेच्यावेळी स्फोटचा आवाज झाल्याने मोठा गोंधळ 

शेट्येनगर येथे दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हा सिलिंडरचा स्फोट झाला. पहाटेच्यावेळी स्फोटचा आवाज झाल्याने मोठा गोंधळ उडाला. अनेक जण झोपेत होते. सकाळी स्फोटाच्या आवाजाने काही जण जागे झालेत. त्यावेळी इमारतीत आगीने मोठा आहाकार उडाला आहे. सिंलिंडर स्फोटानंतर आगीचा भडका उडला. यावेळी कुटुंबातील चार जण अडकले होते. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दोन महिला घरातच अडकल्या होत्या. या दोघींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

सिलिंडर स्फोटानंतर घराला मोठी आग

या स्फोटात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सिलिंडर स्फोटानंतर घरात लागलेल्या आगीमुळं घरात दोन महिला अडकून पडल्या  होत्या. या महिलांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र, त्यात यश आले नाही. आतापर्यंत तीन लोकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी तीन रुग्णवाहिका आणि पोलीस पथक मदतीसाठी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले तरी दोन महिलांना वाचविण्यात यश आलेले नाही. 

अश्फाक काझी पहाडे पाचच्या सुमारा घरी आले आणि त्यांनी लाईट लावली. त्यानंतरच स्फोट झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सिलिंडरमधून गॅस लिक असल्याने वायूची गळती झाल्याची चर्चा होती. मात्र, नेमके अधिकृत कारण देण्यात आलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत. अश्फाक काझी हे रिक्षा चालक आहेत. त्यांचे घर या आगीत भस्मसात झाले. हा स्फोट इतका भीषण होता की जवळपास दोन किलोमीटरच्या परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकू गेला. तर एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर शेजारील घरांच्या काचा उडून काही जण जखमी झाले.