पुण्यातही कचऱ्यावरुन रणकंदन, कचरा प्रकल्पाला आग

शहरातील रामटेकडी परिसरामधल्या रोकेम कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आग लागली आहे. दरम्यान, हा प्रकल्प रद्द करण्यासाठी ही आग सत्ताधाऱ्यांनीच लावली असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 7, 2018, 04:45 PM IST
पुण्यातही कचऱ्यावरुन रणकंदन, कचरा प्रकल्पाला आग title=

पुणे : शहरातील रामटेकडी परिसरामधल्या रोकेम कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आग लागली आहे. दरम्यान, हा प्रकल्प रद्द करण्यासाठी ही आग सत्ताधाऱ्यांनीच लावली असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

दोन कोटींचं नुकसान

या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत प्रकल्पाचं सुमारे २ कोटींचं नुकसान झालय.

 ७०० टन क्षमतेचा हा प्रकल्प 

रामटेकडी परिसरातील ७०० टन क्षमतेचा हा प्रकल्प आहे. दरम्यान हडपसरमध्ये नवीन प्रकल्प लादण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीच रोकेमला आग लावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.