गोवा महामार्गावर पोलिसांकडून चहा-बिस्किटांसह चाकरमान्यांचं स्वागत

गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. गोवा महामार्गावर गणेशभक्तांच्या स्वागतासाठी पोलिसांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आलेत. 

Updated: Aug 24, 2017, 01:09 PM IST
गोवा महामार्गावर पोलिसांकडून चहा-बिस्किटांसह चाकरमान्यांचं स्वागत title=

रत्नागिरी : गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. गोवा महामार्गावर गणेशभक्तांच्या स्वागतासाठी पोलिसांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आलेत. 

विशेष म्हणजे पोलिसांनीदेखील महामार्गावर चाकरमान्यांचे चहा बिस्कीटे आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं. यावेळी महामार्गावर १९ ठिकाणी चेक पोस्ट बसवण्यात आलेत. तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून महामार्गावर देखरेख ठेवण्यात आलीय. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक आणि पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे हे मार्गावर गस्ती घालून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतान दिसत आहेत.

सध्या चाकरमान्यांनी कोकण हाऊस फुल्ल झालंय. गणेशोत्सवाला चाकरमानी कोकणात एक दिवस का होईना हजेरी लावतो. त्यामुळे सध्या गणपतीसाठी गावाकडे जाण्याची लगबग पहायला मिळतेय. सकाळपासून मुंबईतून हजारो चाकरमानी रेल्वेच्या माध्यमातून कोकणात दाखल झालेत. मखराचे साहित्या विविध गणपतीचे सामान घेऊन चाकरमानी आपलं गाव गाठताना पाहायला मिळतायेत. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आलेल्या चाकरमान्यांमध्ये सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळतोय.