गडचिरोलीमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, 26 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोलीमध्ये पोलीस दलाला मोठं यश, 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान... 4 जवान जखमी 

Updated: Nov 13, 2021, 08:43 PM IST
गडचिरोलीमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, 26 नक्षलवाद्यांचा खात्मा  title=

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. धानोरा तालुक्यातल्या ग्यारापत्तीच्या जंगलात ही चकमक झाल्य़ाची माहिती मिळाली आहे.

धानोरा तालुक्यात पोलीस पथकाकडून शोध अभियान राबवण्यात आलं. सकाळी पोलिसांच्या सी-60 पथकाचं शोध अभियान सुरू असताना लपून बसलेल्या नक्षल्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. 

नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर नक्षलविरोधी पथकाचे 4 जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांना 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात मोठं यश आलं आहे.