अकोला : काही दिवसांपूर्वी पुण्यातून अपहरण झालेल्या तनिष्का आरोडेचा मृतदेह अकोला जिल्ह्यात सापडलाय.
मूर्तिजापूर तालुक्यात रेपाडखेड गावात या मुलीचा मृतदेह सापडलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. शुभम जामनिक आणि प्रतिक साठले अशी आरोपींची नावं आहेत.
पण, तनिष्काचं अपहरण का करण्यात आलं होतं? याच कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.