जागो महाराष्ट्र; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाची सत्र सुरु आहेत

Updated: Dec 29, 2019, 12:48 PM IST
जागो महाराष्ट्र; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : महाराष्ट्रात अनेक राजकीय नाट्यांनंतर महाविकासआघाडीचं सरकार आल्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाची सत्र सुरु आहेत. 

अमृता फडणवीस यांनी वारंवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरच्या माध्यमातून निशाण्यावर घेतलं आहे. अमृता फडणवीस या ऍक्सिस बँकेच्या पश्चिम भारताच्या उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट हेड आहेत. ऍक्सिस बँकेमधील जवळपास दोन लाख पोलीस कर्मचाऱ्यांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत वर्ग करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती समोर आल्यानंतर अमृता फडणवीस यांनी टीका केलीय. 

सरकारनं विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवेत. अशा प्रकारे बँकेतील खाते वळवण्याचा निर्णय घेऊन सरकार आपल्याला आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहे असा आरोप अमृता फडणवीस यांनी एका खाजगी वृत्तपत्राशी बोलताना केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ट्विट करणाऱ्या अमृता फडणवीस यांचे यापूर्वीचेही काही ट्विट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. 

"फक्त 'ठाकरे' आडनाव असल्यामुळे..... 

"फक्त 'ठाकरे' आडनाव असल्यामुळे कोणी 'ठाकरे' होत नाही", असा थेट हल्लाबोलच अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे केला. हे ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला होता. 

आपण सावरकर नाही असं विधान राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. यावर देवेंद्र फडणवीसांनी १४ डिसेंबरला ट्विटद्वारे उत्तर दिलं होतं. त्यांच्या त्या ट्विटला अमृता फडणवीस यांनी रिट्विट करत, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. 

'ठाकरे' आडनाव असल्यामुळे कोणी 'ठाकरे' होत नाही, असा सणसणीत टोला लागवत  एक 'ठाकरे' ज्यांनी कायम सत्य, आपली तत्वे आणि लोकांचा कायम विचार केला. यासाठी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांचा विचार करताना कुटुंब आणि सत्ता याला दुय्यम स्थान दिले असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.