या कारणासाठी कंत्राटदाराने मागितले राष्ट्रपतींकडे इच्छा मरण...

नांदेडमध्ये गुरुता गद्दी त्री शताब्दी सोहळ्यानिमित्त 13 कोटी रुपयांच्या परिक्रमा मार्गाचे काम करण्यात आले. 

- & Updated: Jun 11, 2022, 05:16 PM IST
या कारणासाठी कंत्राटदाराने मागितले राष्ट्रपतींकडे इच्छा मरण... title=

नांदेड : नांदेडमध्ये गुरुता गद्दी त्री शताब्दी सोहळ्यानिमित्त 13 कोटी रुपयांच्या परिक्रमा मार्गाचे काम करण्यात आले. मातासाब गुरुद्वारा ते मुदखेड आणि देगलुर नाका ते आसनापर्यंतचा रस्ता मोरेश्वर बिल्डरने केला. 

थोडे काम वगळता बहुतांश रस्ता मोरेश्वर बिल्डरने केल्याचा दावा कंत्राटदाराने केला. मात्र, असे असतानाही मोरेश्वर बिल्डरचे संचालक अशोक म्हात्रे यांना केलेल्या कामाचे पैसे मिळाले नाही. हे प्रकरण मोरेश्वर बिल्डरने सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले. या प्रकरणी न्यायालयाने समिती स्थापन करून बिल निश्चित करण्याचे आदेश दिले.

समितीने बिल निश्चित केले. पण इतके होऊनही पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे मोरेश्वर बिल्डरचे संचालक अशोक म्हात्रे यांनी थेट राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.

14 वर्ष होऊन गेली, समिती नेमली, बिल निश्चित करण्यात आले तरीही 6 कोटी रुपयांचे बिल अदयाप देण्यात आले. हे बिल न मिळाल्याने कजर्बाजारी झाल्याने म्हात्रे यांनी राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली.

दरम्यान, या प्रकरणी मुख्य अभियंता पांढरे यांच्याशी संपर्क साधला असता मोरेश्वर बिल्डरचे तेवढे देयक होत नसल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी सचिव स्तरावर दोन बैठका झाल्या आहेत. बिलाबाबत समिती सदस्यांमध्ये मतभेद असून येत्या 20 जून रोजी याबाबत बैठक बोलावली असून त्यात निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.