पंढरपुरात आता २४ तास दर्शन तर ऑनलाइन बंद

३१ ऑक्टोबरला कार्तिकी यात्रा सोहळा असल्यानं पंढरीत भाविकांची संख्या वाढतेय. त्यामुळे रविवारपासून ऑनलाइन दर्शन बंद करुन २४ तास दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलाय. 

Updated: Oct 24, 2017, 12:44 PM IST
पंढरपुरात आता २४ तास दर्शन तर ऑनलाइन बंद  title=

सोलापूर : ३१ ऑक्टोबरला कार्तिकी यात्रा सोहळा असल्यानं पंढरीत भाविकांची संख्या वाढतेय. त्यामुळे रविवारपासून ऑनलाइन दर्शन बंद करुन २४ तास दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलाय. 

आता २५ ऑक्टोबरपासून व्हीआयपी दर्शन पासही बंद करण्यात येणार आहे. दिवाळी सुट्टी आणि कार्तिकी यात्रा सोहळ्यानिमित्त पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होऊ लागलीय. 

दर्शनरांग कासारघाटाच्या पुढे गेली असून ती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीनं २२ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन दर्शन बंद करुन २४ तास दर्शन सुरु ठेवलेय. त्यामुळे आता भाविकांना दर्शन घेणं सोयीचं झाले आहे.