मसालाही भेसळयुक्त! मालेगावात सापडला कारखाना; कसा ओळखतात बनावट मसाला? तज्ज्ञ म्हणाले...

ऐन दिवाळीत भेसळयुक्त मसाला विकला जात असल्याचा प्रकार नाशिकच्या मालेगावातून समोर आला आहे. मालेगावजवळील एका कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून सव्वा लाख रुपयांची मिरची पावडर आणि 24 हजारांची मसाला पाकिटे असे जप्त केले आहे

Updated: Nov 10, 2023, 04:17 PM IST
मसालाही भेसळयुक्त! मालेगावात सापडला कारखाना; कसा ओळखतात बनावट मसाला? तज्ज्ञ म्हणाले... title=

Nashik Crime : दिवाळीत तुम्ही चमचमीत पदार्थ बनवत असाल तर सावधान...कारण तुम्ही वापरत असलेले मसाले भेसळयुक्त (colored chili powder) असण्याची शक्यता आहे. कारण मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून भेसळ करणाऱ्या मसाल्यांचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. गुलशन-ए-मदिना नावाच्या बंगल्यात SEA-MA मसाले प्रॉडक्ट प्रा. लि. या कंपनीच्या कारखाना सुरू होता. या कारखान्यात रंगांचा वापर करून तिखट आणि मसाले तयार करण्यात येत होते. कायद्यानं मसाले आणि तिखटासाठी रंग वापरण्यास बंदी आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर खाद्य रंग साठवण्यात आल्याचं आढळून आलं. तब्बल दोन लाख रुपये किमतीचे भेसळयुक्त मसाले या कारवाईत जप्त करण्यात आले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने खाद्य पदार्थांची तपासणी मोहीम सुरु केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी मालेगाव येथील सी- मा मसाले प्रॉडक्ट, गुलशन ए मदिना, मालदे शिवार येथे धाड टाकून सिंथेटीक रंगांचा समावेश असलेला लाखो रुपयांचा मिरची पावडरचा साठा आणि टीका मसाला जप्त केला आहे.

मिर्ची व मसाल्यामध्ये कायद्याप्रमाणे रंग वापरण्यास बंदी असूनही मालेगावात मिरची पावडर व टिका मसाल्यामध्ये सिंथेटीक रंग आढळून आला. या कारवाईत 24 हजार रुपये किमतीचा आठशे पाकिटे टिका फ्राय मसाला, कुठल्याही प्रकारचे लेबल नसलेली 1 लाख 61 हजार 400 रुपये किमतीची 538 किलो मिरची पावडर, साडेआठ किलो 740 रुपये किमतीचा सिंथेटीक रंगाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याची एकूण किंमत ही 1 लाख 85 हजार 740 रुपये असल्याचे समोर आलं आहे.

दरम्यान या प्रकरणी मसाल्याचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे अहवाल आल्यावर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या विक्रेत्याची संशयास्पद हालचाल वाटत असल्याने बुधवारी सापळा रचला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मसाले खरेदी करताना काय खबरदारी घ्यावी?

सुट्टे विना पॅक मसाले खरेदी करू नका

एगमार्क किंवा जैविक भारत लोगो असलेल्या पॅकेजमध्येच मसाले खरेदी करा

पॅकेजवर छापलेले उत्पादन माहिती काळजीपूर्वक वाचा

विचित्र वास किंवा गडद रंग असलेले मसाले खरेदी करणे टाळा

लाल तिखटमध्ये कशी ओळखावी भेसळ?

मिरची पावडरच्या चवीमध्ये फरक झालेला आढळून येतो. एक ग्लास पाण्यात एक चमचा लाल मिरची पावडर टाकावी ही पावडर पाण्यात विरघळल्यास त्यामध्ये भेसळ असल्याचे कळते. लाल रंग वर तरंगल्यास भेसळ ओळखता येते. लाल मिरचीमध्ये भेसळ करण्यासाठी ब्रिकेट्स तालक किंवा मीठ पावडर, कृत्रिम रंग , ग्रिट वाळू लाकडू , भुसा, वाळलेल्या टोमॅटोच्या साली वापरल्या जातात. धणे पावडरमध्ये भेसळ करण्यासाठी पेंढा किंवा जनावराचे शेण वापरले जाते.

आरोग्याला अपायकारक

दीर्घकाळ भेसळयुक्त मसाले सेवन करणाऱ्यांना पोटाचा समस्या निर्माण होऊ शकतात कर्करोग, उलट्या, जुलाब, अल्सर ,त्वचेचे विकार, न्यूरो टॉक्सी सीसीटी सारखा मोठा धोका वाढू शकतो.