प्रदूषित पाण्यामुळे सांगलीत कृष्णा नदीत शेकडो माशांचा मृत्यू

शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 4, 2018, 04:08 PM IST
प्रदूषित पाण्यामुळे सांगलीत कृष्णा नदीत शेकडो माशांचा मृत्यू  title=

सांगली : शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

पाण्याची खालावलेली पातळी आणि नाल्यातून मिसळणा-या प्रदूषित पाण्यामुळे सांगलीत कृष्णा नदीत शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे. सांगली शहराजवळ कृष्णा नदीत मृत माशांचा खच पडला आहे. प्रदूषित पाण्यामुळे नदीतील ऑक्सिजन कमी झाल्याने, नदीतील मासे मृत्युमुखी पडलेत.

सांगली शहराजवळ शेरी नालासह अन्य तीन नाले कृष्णा नदीत मिसळतात. या नाल्यातील दूषित पाण्यामुळे कृष्णा नदीत प्रदूषित होते. त्यातच सध्या कृष्णेची पाणी पातळी कमी झालीय. त्यामुळे नदीतील माश्यांच जीवन धोक्यात आलंय. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय.