भिवंडीत गोदामाला भीषण आग

भिवंडीतल्या माणकोली नाका इथल्या व्ही आर एल लॉजिस्टीक गोदामाला भीषण आग लागली. 

Updated: Feb 3, 2018, 11:42 PM IST
भिवंडीत गोदामाला भीषण आग title=

भिवंडी : भिवंडीतल्या माणकोली नाका इथल्या व्ही आर एल लॉजिस्टीक गोदामाला भीषण आग लागली. 

शनिवारी दुपारी साडे तीन वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि दोन वॉटर टँकर तातडीनं घटनास्थळी पोहोचले.

या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न रात्री उशीरापर्यंत सुरु होते.