अंबरनाथ : चिखलोली धरणाचं पाणी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. तसेच याबाबत आठवड्याभरात पर्यावरण मंत्र्यांकडे अहवाल पाठवला जाईल, त्यात ज्या कंपन्या दोषी आढळतील त्याच्या विरोधात कठोर करावी करण्याचे आदेश राज्य मंत्र्यांनी दिलेत.
अंबरनाथच्या चिखलोली धरणातील पाणी हे पिण्यास अयोग्य असल्याचा धक्कादायक अहवाल पाणी पुरवठा विभागाकडे आला होता . याबाबत प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रसारित करताच त्याची गंभीर दखल घेत ,राज्याचे कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी चिखलोली धरणाला भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष धरणाची पाहाणी केली यावेळी सर्वच पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चिखलोली धरणातुन अंबरनाथ शहराला सहा एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे जो पर्यंत चिखलोली धरणातील पिण्या योग्य होत नाही तो पर्यंत नागरिकांना पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश हि खोत यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले.