दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोघांनी गमावला जीव

हिंगोली शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. काल रात्री दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघांचा जीव गेलाय. तर १२ जण जखमी आहेत, त्यापैंकी दोघे गंभीर जखमी आहेत.

Updated: Aug 18, 2017, 01:12 PM IST
दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोघांनी गमावला जीव title=

हिंगोली : हिंगोली शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. काल रात्री दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघांचा जीव गेलाय. तर १२ जण जखमी आहेत, त्यापैंकी दोघे गंभीर जखमी आहेत.

या सर्वांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलंय. दोन्ही गटाच्या प्रत्येकी एकाचा या मृतांमध्ये समावेश आहे. गजानन महावीर आणि जितेंद्र प्यारेलाल अशी मयतांची नावं आहेत.

घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यासह दंगल नियंत्रक पथकाला येथे पाचारण करण्यात आल होतं. या हाणामारीत लोखंडी रॉड, कोयत्यासह धार दार शस्त्रांचा वापर करण्यात आला.  

गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास मोची गल्लीत येथे घडलीय. घटनेचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. गांधी चौकातील चप्पलांच्या दुकानावरून हा वाद वाढल्याचं समोर येतंय. दोन्ही गटांत अनेक दिवसापासून खटके उडत होते, अशी माहिती आहे. सदर घटनेमुळे हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.