विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चोरीप्रकरणी पिता-पुत्रांना अटक

टाकळघाट येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. ताराचंद चौधरी आणि दुर्गेश चौधरी असे अटक केलेल्या आरोपी पिता पुत्राचे नाव आहे.

Updated: Jul 8, 2017, 11:36 AM IST
 title=

नागपूर : टाकळघाट येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. ताराचंद चौधरी आणि दुर्गेश चौधरी असे अटक केलेल्या आरोपी पिता पुत्राचे नाव आहे.

मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये हि चोरी कैद झाली होती. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पिता - पुत्रांना अटक केली.आषाढी एकादशीचे कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशीरा या चोरट्यांनी विठ्ठल मंदिरातील दानपेटी फोडून रोकड रक्कम चोरून नेली तर शिवमंदिरातील दानपेटी फोडून तेथील पैसे व साऊंड मशिन चोरट्यानी लंपास केला.

दोन्ही चोरटे दान पेटी नेताना, मूर्तीवरील दागिने लंपास करण्यासाठी चॅनल गेट तोडताना दिसत आहे. आषाढी एकादशी निमित्त येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्यामुळे रात्री १२ वाजेपर्यंत भक्तांची गर्दी होती. रात्री ३ च्या सुमारास चोरट्यानी  शिवमंदीरातील सीसीटीव्ही कॅमराचा वायर कापून दानपेटी फोडून रक्कम लंपास केली.  

मात्र, विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सीसीटीव्ही त्यांना दिसला नाही.  मंदिरातील चोरट्यांचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सिसिटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा माल जप्त केला आहे.