पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटून बस 25 फूट खाली घसरली अन्...

Pune News : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर नजीक खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. अपघातात दहा ते अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Sep 8, 2024, 09:48 PM IST
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटून बस 25 फूट खाली घसरली अन्... title=

Accident On Pune Solapur National Highway : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहराजवळ खाजगी बसला  भीषण अपघात झाला आहे. मुख्य महामार्गावरून बस जवळपास 25 फूट खाली घसरली. अर्धी बस कठड्यावर अडकली.  या अपघातात  दहा ते अकरा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती.  इंदापूर बाह्यवळणापासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर या बसचे दोन्ही टायर फुटल्याची माहिती मिळतेय. टायर फुटल्याने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला या बसने धडक दिली. धडक इतकी भीषण होती ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली जाऊन आदळली. या बस मध्ये नेमकी किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र, या अपघातात बसमधील 10 ते 11 प्रवासी गंभीर जखमी झाले असून या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिस आणि एन एच ए आय चे पथक या ठिकाणी दाखल झाले आहे.

MH 04 KF 5969 क्रमांकाची ही खाजगी बस होती सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मधून पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती. दापूर पासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर ती TN 93 B 3062 क्रमांकाचा मालवाहु ट्रक पुण्याच्या दिशेने निघाला होता आणि बसचे टायर फुटल्याने या बसने या ट्रकला धडक दिली या अपघातात ट्रक मधील असणारा लोखंड देखील रस्त्यावर विखुरला गेलं तर ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून थेट 25 फूट रोडच्या बाहेर जाऊन आदळली.

सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र बसचा आणि या खाजगी मालवाहू ट्रकच्या मोठ्या नुकसान झालाय तर 10 ते 11 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इंदापूर पोलीस महामार्गावर अपघात ग्रस्त असणारा ट्रक बाजूला घेण्याचे काम करत असून पोलिसांनी वाहतूक देखील सुरळीत केली आहे.