नाशिक : जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पूर ओसरला असला तरी पुराची दाहकता समोर येऊ लागली आहे. पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मका, ऊस, भाजीपाल्यासह विविध पिकांचे नुकसान झाले आहे.
पुरामुळे सखल भागांतील शेतात पाणी साचून राहिले होते. त्यामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. पिके पाण्यात असल्याने कुजली आहेत. काही ठिकाणची शेतजमीन पुरामुळे वाहून गेली आहे.
नुकसान मोठे असल्याने अद्याप बऱ्याच ठिकाणी पंचनामे झालेले नाही. शेतकऱ्यांनी आपल्याकडे जे होते त्यातून पेरणी केली. मात्र पुरात सारे काही वाहून गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे महसूल विभागाने त्वरित सर्वेक्षण करून नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.