'मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, शेतकऱ्यांची दिवाळी कडू'

बहुतांश शेतकऱ्यांच्या हातात दिवाळी संपत आली तरी अजूनही सरकारी मदतीचे पैसेच आलेले नाहीत

Updated: Nov 16, 2020, 08:58 PM IST
'मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, शेतकऱ्यांची दिवाळी कडू' title=

विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी २४ तास : परतीच्या पावसात उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी कडू झालीय. सरकारनं मदत जाहीर केली पण बहुतांश शेतकऱ्यांच्या हातात दिवाळी संपत आली तरी अजूनही सरकारी मदतीचे पैसेच आलेले नाहीत

मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता पण तो पाळला नाही. सरकारी मदत मिळाली नसल्यानं राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली. सरकारनं १० हजारांचं पॅकेज जाहीर केलं पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटीच दिले. दिलेले पैसेही शेतकऱ्यांच्या हातात अजूनही पडलेले नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली.

सरकार दिलेला शब्द पाळत नाही अशी टीका विरोधकांनी केलीय.

जे बोलतो ते करुन दाखवतो असा उद्धव ठाकरे म्हणतात. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत त्यांना शब्द पाळता आलेला नाही.