Bacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, 'गद्दारांसोबत का गेलात?'

Bacchu Kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील शेतकऱ्याची भेट घेतली. यावेळी बच्चू कडू  यांना शेतकऱ्यांनी (Farmers ) पुन्हा एकदा घेरले आहे. याआधी धाराशिवमध्येही बच्चू कडू यांना एका शेतकऱ्याने हाच प्रश्न विचारत घेरलं होते. त्यानंतर याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत होता.

Updated: Mar 10, 2023, 02:44 PM IST
 Bacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, 'गद्दारांसोबत का गेलात?' title=

Farmers asked Bacchu Kadu : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारसोबत जाणाऱ्या माजी राज्यमंत्री  बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना शेतकऱ्यांनी (Farmers ) पुन्हा एकदा घेरले आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात, मात्र गद्दारांसोबत जायला नको होते, अस शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना म्हटले आहे. ( Maharashtra Political News) नाशिकच्या निफाडमध्ये बच्चू कडू हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. तेव्हा हा सर्व प्रकार घडला. याआधी धाराशिवमध्येही बच्चू कडू यांना एका शेतकऱ्याने हाच प्रश्न विचारत घेरलं होते. त्यानंतर याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत होता.

शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. तसेच कांद्याला भाव मिळत नाही. तर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. यावरुन शेतकरी प्रचंड संतापला आहे. राज्यातील कांदा प्रश्नावर विरोधकांनी राज्य सरकारला विधानसभेत घेरले. कांद्याचा प्रश्न उग्र होत चालला असताना शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी बच्चू कडू नाशिकमध्ये गेले होते. मात्र, त्यांना यावेळी वेगळाच अनुभव आला. त्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला. 

शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने राज्यातील नाशिक, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी उभा पिकावर आता नांगर फिरवला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळख असलेल्या अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील शेतकऱ्याची भेट घेतली. कांदा उत्पादक शेतकऱ्याला आपल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळाला नाही म्हणून त्यांनी आपल्या कांदा पिकावर रोटर फिरवला होता. त्यांची भेटीच्यावेळी शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना घेरलं आणि चांगलाच जाब विचारला. तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी ना, मग  गद्दारांबरोबर का गेलात, असा थेट सवाल केला. हा त्यांच्यासोबत झालेला दुसरा प्रकार आहे.

हा गद्दारीचा बाप आहे?

धाराशिव (Dharashiv) येथे  बच्चू कडू हे कोर्टाच्या कामानिमित्त आले होते. यावेळी एका ज्येष्ठ शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांची गाडी अडवली. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, बच्चू कडू यांनी त्यांना बोलू द्या, असे सांगतात या शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला.  कोर्टाचं काम आटोपून बच्चू कडू बाहेर निघत होते. ते कार्यकर्त्यांशी, जनतेशी संवाद साधत होते. तेव्हा एक वृद्ध शेतकरी तेथे आले. बच्चू कडू यांना थेट सवाल त्यांनी केला. 

महाराष्ट्राला जनतेला का त्रास देत आहात? गद्दारी केली. हा गद्दारीचा बाप आहे. अशा शब्दात त्यांनी थेट जाब विचारला. यावेळी तुमचं नेमकं काय म्हणणं आहे, असे शेतकऱ्याला विचारण्यात आलं. मात्र हा आमचा आमदार आहे, त्याने गद्दारी केली, असं वारंवार ते बोलत होते. अखेर बच्चू कडू गाडीत बसले. त्यानंतरही या शेतकऱ्याने त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अखेर या शेतकऱ्याला बाजूला केलं आणि बच्चू कडू यांचा ताफा पुढे रवाना झाला.