कीटकनाशक फवारणीमुळे धुळ्यातल्या शेतक-याचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील दरशथ कोळी या 28वर्षीय शेतक-याचा कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झाला.

Updated: Oct 8, 2017, 05:47 PM IST
कीटकनाशक फवारणीमुळे धुळ्यातल्या शेतक-याचा मृत्यू  title=

धुळे : धुळे जिल्ह्यातील दरशथ कोळी या 28वर्षीय शेतक-याचा कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झाला. त्यांना 25 सप्टेंबरला कपाशीवर कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मालकीची 2 एकर शेती होती.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेलमधील दशरथ कोळी हा शेतकरी शेतात कापसाला कीटकनाशक औषध स्वता:च्या शेतातील कापसावर फवारणी करत असतांना अचानक चक्कर यायला लागली. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी  आणि गावक-यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. 8 दिवस उपचार घेतल्यावर त्यांना धुळे जिल्हा सरकारी रूग्णालयात दाखल केलं. याठिकाणी दोन दिवस उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.