Accident : शेवटी तो शेतात पोहचलाच नाही... तरुण शेतकऱ्याचा भयानक मृत्यू; महिनाभरापूर्वीच झाले होते लग्न

Crime News : शेतात रोटावेटर मारण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर चारीत कलंडून झालेल्या अपघातात हा तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.  नाशिक जिल्ह्यातील देवळ्याच्या खामखेडा गावात ही हृदयद्रावक घटना  घडली.

Updated: Apr 23, 2023, 11:07 PM IST
Accident : शेवटी तो शेतात पोहचलाच नाही... तरुण शेतकऱ्याचा भयानक मृत्यू; महिनाभरापूर्वीच झाले होते लग्न title=

निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : जन्म आणि आणि मृत्यू कुणाच्याच हातात नसतो. यामुळेच मृत्यू कुणाला कधी कुठे हे कुणीच सांगू शकत नाही. अशीच एक हृदयद्रावक घटना मनमाडमध्ये (Manmad) घडली आहे. शेतात निघालेल्या तरुण शेतकऱ्याचा अत्यंत विचित्र पद्धतीने मृत्यू झाला आहे. महिनाभरापूर्वीच  या तरुणाचा विवाह झाला होता. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या नव विवाहीत जोडप्याची काळाने ताटातुट केली आहे.  

शेतात रोटावेटर मारण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर चारीत कलंडून झालेल्या अपघातात हा तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.  नाशिक जिल्ह्यातील देवळ्याच्या खामखेडा गावात ही हृदयद्रावक घटना  घडली. राकेश धोंडगे असे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.  खामखेड्याच्या शेवाळे वस्तीजवळ हा अपघात घडला. विषेश म्हणजे महिना भरापूर्वीच राकेशचा विवाह झाला होता. काळाने राकेशवर घाला घातल्याने संपूर्ण संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेतातील मोटार लावतांना शॉक लागून शेतक-याचा मृत्यू

शेतातील मोटार लावतांना शॉक लागून शेतक-याचा मृत्यू झाला आहे. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथे ही घटना घडली आहे.  पांडुरंग व्यंकटी मुळे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.  शेतकरी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी मोटार लावत असतांना विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पांडुरंग मुळे हे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी मोटार लावत असताना सदरची घटना घडली.  स्टार्टरच्या शॉर्टसर्किटमुळे शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मयत पांडुरंग यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, तीन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.

पुणे बेंगलोर महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात

पुणे बंगळुरू महामार्गावर ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 22 जण जखमी झालेत. मध्यरात्री दोन वाजता नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ हा अपघात झाला. जखमींना पुणे आणि PMRDA अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले असून जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकनं खासगी बसला पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. साताऱ्याकडून मुंबईकडं ही बस जात होती. ट्रक चालकाचं ट्रकवरून नियंत्रण सुटल्यानं हा अपघात. यात ट्रकचालकाचा देखील मृत झालाय. दरम्यान अपघातस्थळी खासदार सुप्रीया सुळे यांनी भेट दिलीय.