Jalgaon Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जळगाव येथील बहुचर्चित सभेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. जळगावातील पाचो-यातील या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट तसेच भाजप पक्षावर रोजरा निशाणा साधला. गाईल संरक्षण देताय, आधी आईला संरक्षण द्या असं म्हणत जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी ठाणे येथील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरुन शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
पाचो-यातल्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला. जे जे माझ्यासोबत राहिले त्यांच्या मागे ईडी,सीबीआय लागली असं म्हणत त्यांनी शिवसेना आमदारांची नावंच वाचून दाखवली. त्यापूर्वी बहिणाबाईंच्या कवितांचा दाखला देत ठाकरेंनी शेतकरी आत्महत्यांवरुन सरकारला धारेवर धरलं. वैभव नाईक, राजन साळवींना त्रास दिला. जे जे माझ्यासोबत त्यांच्यामागे ससेमिरा' 'या सरकारनं बहिणाबाईंनाही अटक केली असती' बहिणाबाई आज असत्या तर त्यांनाही या सरकारने तुरुंगात टाकायला कमी केलं नसतं असा घणाघात देखील उद्धव ठाकरे यांनी केला.
नितीन देशमुख यांना झोपेचे इंजेक्शन देऊन गुवाहाटीला नेले गेले. त्यांना मारहाण करण्यात आली. मात्र, नितीन देशमुख त्यांंच्यात सामील झाला नाही. अनेक शिवसैंनिकांनी ईडीची भिती दाखवली गेली. मात्र, संजय राऊत, नितीन देशमुख, वैभव नाईक यांसारख्या सच्च्या शिवसैंनिकांनी माझी साथ सोडली नाही. मला सहानुभूती नकोय, गद्दारांवरचा राग व्यक्त करायचा आहे अस म्हणत उद्धव ठाकरेंचा शिंदे-भाजपवर हल्लाबोल केला.
महिलावंर सातत्याने अत्याचार सुरुच आहेत. ठाण्यात रोशणी शिंदे या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. यानंतर या रोशनी शिंदे यांनी माफी मागितली होती. तरी देखील त्यांना मारहाण करण्यात आली. गायीला संरक्षण देताय, आधी आईला संरक्षण द्या. अजुनही महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत.
सभेला जमलेली गर्दी पाहून शिवसेना कोणाची? हे दिसतंय ना? पाकिस्तानला विचारलं की शिवसेना कोणाची तर पाकिस्तानही सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला दिसत नाही. त्यांचा दोष आहे. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
काही लोकांना वाटलं होतं की ते म्हणजेच शिवसेना. सभेत घुसणार असे म्हणाले होते. अशा घुशी आम्ही खूप पाहिल्या आहेत. पण निवडणुकीच्या रिंगणात अशा घुशी खोदून, शेपट्या धरुन राजकारणात आपटायच्या आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला.