दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : शेतकरी कर्जमाफीतील सरकारचा आकड्यांचा घोळ पुन्हा एकदा उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले कर्जमाफीचे आकडे आणि सहकार मंत्र्यांनी दिलेले कर्जमाफीच्या आकड्यांमध्ये तफावत दिसत आहे.
राज्यातील १५ लाख ४२ हजार शेतकर्यांच्या खात्यावर ६ हजार ५०० कोटी रुपये जमा झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी 24 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबरला केला होता.
मुख्यमंत्र्यांनी याचा उल्लेख २४ नोव्हेंबर रोजी कोल्हापूरच्या भाषणात तर २५ नोव्हेंबर रोजी ट्विटरवर केला होता
मात्र सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिलेली माहिती मुख्यमंत्र्यांच्या माहितीपेक्षा वेगळी असल्याचे आजच्या दिसून आले. ५ डिसेंबरपर्यंत ९ लाख ४३ हजार शेतकर्यांच्या खात्यात ५ हजार १४२ कोटी रुपये जमा झाल्याची सहकार मंत्र्याची विधानसभेतील लेखी उत्तरात माहिती देण्यात आली आहे.
आतापर्यंत १०३ आमदारांनी या संदर्भात लेखी स्वरूपात प्रश्न विचारला आहे. विधिमंडळाच्या इतिहासात एकाच प्रश्नावर इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारल्याची ही पहिली वेळ आहे. त्यामुळे हा विक्रम झाला आहे.