फेसबुकच्या मैत्रीतून तिच्यावर वर्षभर बलात्कार

 सोशल मीडियाचा गैरवापर करुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोशल मीडियावर मैत्री करताना जागरुक राहा असे वेळोवेळी सांगितले जात असताना याकडे दुर्लक्षच होत असल्याचे दिसत आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 8, 2017, 04:01 PM IST
फेसबुकच्या मैत्रीतून तिच्यावर वर्षभर बलात्कार title=

नाशिक : सोशल मीडियाचा गैरवापर करुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोशल मीडियावर मैत्री करताना जागरुक राहा असे वेळोवेळी सांगितले जात असताना याकडे दुर्लक्षच होत असल्याचे दिसत आहे.

एका शाळकरी मुलीवर तिच्या मित्रानेच वर्षभर बलात्कार केल्याची घटना नाशिकच्या सिडको परिसरात घडली आहे. फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीतून धक्कादायक घटना समोर आली आहे.

 हे दोघेही अल्पवयीन असून मुलगी दहावीत शिकत असून मुलगा अकरावीचं शिक्षण घेत आहे. हे दोघेही नाशिकच्या एका नामांकित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची फेसबुकच्या माध्यमातून अडीच वर्षांपूर्वी मैत्री झाली होती. या मैत्रीतून पुढे या दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या होत्या. आता वर्षभरानंतर या मुलीने मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

 तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियाच्या गैरवापरातून हे सर्व प्रकार होत असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. अंबड पोलिस स्टेशनला मुलाविरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. तक्रारीनुसार पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

‘माझ्यावर जबरदस्ती अत्याचार केले’

या मुलाने जबरदस्तीने अत्याचार केले आणि त्याचे चित्रीकरण करून घरी व्हिडीओ दाखवण्याची धमकी देत नंतर वारंवार असे प्रकार केल्याचे मुलीने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे मुलासमोरच्या अडचणी आता वाढल्या आहेत.  

‘मुलाने शिवीगाळ केली’

हा सर्व प्रकार मुलीच्या आईला समजला असता तिने मुलाला याबाबत विचारणा केली. तेव्हा या मुलाने पिडीत मुलीच्या आईलाही शिवीगाळ केल्याचं तक्रारीत म्हटले आहे.