सिडको घरांसाठीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला मुदतवाढ

सिडको गृहप्रकल्प ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Updated: Oct 5, 2019, 06:48 PM IST
सिडको घरांसाठीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला मुदतवाढ title=
Pic Courtesy : CIDCO Portal

नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या गृहप्रकल्पाची ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील ८१४ आणि महागृह  निर्माण योजनेतील ९,२४९ घरांकरिता ऑन लाईन अर्ज मागवण्यात आले  होते. या घरांसाठी अर्ज मागवण्याची मुदत स्वप्नपूर्ती गृहनिर्माणसाठी ५  ऑक्टोबर  आणि महागृह निर्माण योजनेसाठी १८ ऑक्टोबर २०१९ ही देण्यात आली होती.

आता अर्ज करण्याच्या मुदतीतवाढ करण्यात आली आहे. ५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तर अनामत रक्कम आणि अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत दिनांक ६ नोव्हेंबर २०१९ ही असणार आहे. या योजनेची सोडत २६ नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे.