सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत 'धक्कातंत्र', आमदार नितेश राणे यांची मागच्या दाराने एंट्री

Sindhudurg District Bank News :कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पुन्हा एकदा धक्कातंत्र दिसून आले आहे. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची एंट्री झाली आहे. 

Updated: Feb 18, 2022, 03:37 PM IST
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत 'धक्कातंत्र', आमदार नितेश राणे यांची मागच्या दाराने एंट्री title=

कोल्हापूर : Sindhudurg District Bank News :कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पुन्हा एकदा धक्कातंत्र दिसून आले आहे. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची एंट्री झाली आहे. त्यांची ही एंट्री मागच्या दाराने करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी  जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालक पदासाठी नाव निश्चित केले आहे. (Entry of MLA Nitesh Rane in Sindhudurg District Bank)

सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनेलने निर्विवाद बाजी मारल्यानंतर आता या जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालक पदासाठी आमदार नितेश राणे यांचे नाव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर दुसऱ्या स्वीकृत संचालक पदासाठी प्रकाश मोर्ये यांचे नाव निश्चित झाले आहे.

आमदार नितेश राणे यांची थकबाकी असल्याचे कारण देत जिल्ह्या बँक निवडणुकीत मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले होते. मात्र आमदार नितेश राणे या संपूर्ण निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती.  आता स्वीकृत संचालक म्हणून आमदार नितेश राणे यांनी स्वतः जिल्हा बँकेत एंट्री केल्यामुळे जिल्हा बँकेच्या वर्तुळात एक वेगळा ट्विस्ट निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या आजच्या बैठकीत स्वीकृत संचालक म्हणून नितेश राणे यांची निवड करण्यात आली.