Man Ki Bat : नाशिकच्या शेतकऱ्याचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

मेक इन इंडिया अंतर्गत संशोधित सॅनिटायझर मशीनमुळे कोरोनाच्या विळख्यातून  बाहेर येणं सोपं होणार आहे.    

Updated: May 31, 2020, 01:46 PM IST
Man Ki Bat : नाशिकच्या शेतकऱ्याचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक  title=

नाशिक : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरस या धोकादायक विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र सॅनिटायझर फवारणी सुरू करण्यात आली आहे. अशात नाशिक जिल्ह्यातील राजेंद्र जाधव यांनी सॅनिटायझर फवारणी करण्यासाठी एक यंत्र तयार केलं आहे. या यंत्राला त्यांनी ‘यशवंत’असे नाव दिले आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाणमधील शेतकरी राजेंद्र जाधव यांनी गावात करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून छोट्या टँकरने सॅनिटायझर फवारणी सुरू केली. त्यांच्या या उल्लेखणीय कामाची तसदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतली आहे. 

राजेंद्र जाधव यांचे अभियांत्रिकीत शिक्षण झालेले आहे. त्यामुळे यंत्रसामुग्रीचा योग्य तो वापर करणे त्यांना उत्तम रित्या ठावूक आहे. अवघ्या २५ दिवसांमध्ये त्यांनी ‘यशवंत’नावाचं यंत्र विकसित केलं आहे. या यंत्राच्या मदतीने रस्ते, सोसायट्या, दारे, कुंपणाच्या भिंती अगदी स्वच्छ धुवून काढणे सहज शक्य होत आहे.

या स्वच्छता यंत्रामध्ये एकावेळेस ६०० लीटर जंतुनाशक मिश्रीत द्रावण टँकरमध्ये ठेवण्याची सुविधा आहे. हे यंत्र साकारण्यासाठी त्यांना सुमारे १ लाख ७५ लाखांचा खर्च आला आहे. कोरोनावर विजय मिळवण्यासाठी हे यंत्र प्रभावी असल्याचं सांगत त्यांनी  या यंत्राला 'यशवंत' असं नाव दिलं आहे. 

मेक इन इंडिया अंतर्गत संशोधित सॅनिटायझर मशीनमुळे कोरोनाच्या विळख्यातून  बाहेर येणं सोपं होणार आहे. भविष्यकाळात त्यांच्या या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाण्याची शक्यता आहे. यंत्रामुळे प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला खूप मोठा आधार मिळणार आहे.