कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणारा कर्मचारी बडतर्फ; केडीएमसीची कारवाई

kalyan-dombivli news :आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. केडीएमसी प्रशासनाने चौकशीनंतर ही कारवाई केली. 

Updated: Dec 27, 2023, 11:54 PM IST
 कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणारा कर्मचारी बडतर्फ; केडीएमसीची कारवाई title=

Kalyan Dombivli Municipal Corporation : कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. केडीएमसी प्रशासनाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्याची चौकशी देखील करण्यात येत आहे.  

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड या मोहने ,अंबिवली, टिटवाळा प्रभाग क्षेत्र "अ"परिसरात पाहणी करत होत्या. याच वेळी धर्मेंद्र सोनवणे हा महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी दुचाकीवरून आयुक्तांच्या कारचा पाठलाग करत होता. आयुक्तांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला थांबवले. तसेच त्याच्या चौकशीचे आदेश दिले.

यानंतर प्रशासनाने त्याला कारणे दाखवा नोटीस दिली. मात्र त्याने त्याचे समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.आयुक्त जाखड यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरू केला असून त्या पाहणी दरम्यान कुठे कुठे जातात याची माहिती हा कर्मचारी देत त्रयस्थ व्यक्तीला देत असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, आता ऑन ड्युटी असतांना इतर ठिकाणी आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल अशा इशारा या माध्यमातून देण्यात आलाय.

पोलीस बंदोबस्त करत असणाऱ्या महिला कॉन्स्टेबलची केली आमदार दंगेकारांनी चौकशी 

पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग बाहेर आज शिक्षकांचा मोर्चा होता. आणि या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी लष्कर पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबलला ड्युटी लावण्यात आली. हातात लहान बाळ घेऊन ही महिला कॉन्स्टेबल आपलं कर्तव्य बजावत होती. कर्तव्य बजावत असताना लहान मुलगा रडत होता. मुलगा रडत असताना पाहून आमदार रवींद्र धंगेकर त्या ठिकाणी आले. आणि त्यांनी या महिला कॉन्स्टेबलची विचारपूस केली. विचारपूस केली असता महिला कॉन्स्टेबलने वरिष्ठ त्रास देत आहेत. लहान बाळ असतानाही बंदोबस्ताच्या ड्युट्या लावत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांना फोन लावून याबाबत विचारणा केली. विचारणा केली असताना हा प्रकार चुकीचा झाला आहे. याबाबत पोलिस आयुक्तांना आपण भेटणार असून पाटील यांना टाकीत देण्याचा सूचना देणार आहोत. सावित्रीच्या लेकीला अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर गृहमंत्री काय करतायेत असा प्रश्न आमदार धंगेकारांनी उपस्थित केला. वरिष्ठांकडे वेळोवेळी तक्रार करूनही उपयोग होत नाही.लहान मुलाला घेऊन मला ड्युटी करावी लागते माझ्यासारख्या अनेक महिला कॉन्स्टेबल आहेत त्यांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्रास देत असल्याचं महिला कॉन्स्टेबल यांनी सांगितलं.