चंद्रपुरात शिवसेनेचा वीज कंपनीच्या कामगारांना चोप

चंद्रपुरमध्ये वीज मनो-यांच्या उभारणीमुळं त्रासलेल्या शेतक-यांसाठी शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना आमदार बाळू धानोरकर स्वतः आंदोलनात उतरले. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 12, 2018, 08:55 PM IST
चंद्रपुरात शिवसेनेचा वीज कंपनीच्या कामगारांना चोप title=

चंद्रपूर : चंद्रपुरमध्ये वीज मनो-यांच्या उभारणीमुळं त्रासलेल्या शेतक-यांसाठी शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना आमदार बाळू धानोरकर स्वतः आंदोलनात उतरले. 

कायदा घेतला हाती

एवढंच नव्हे तर आमदार महोदयांनी कायदा हातात घेत, त्यांनी वीज मनोरे उभारणा-या कंपनीच्या कामगारांना थेट चोप दिला. राजुरा तालुक्यातील भुरकुंडा येथे शिवसेनेनं हा राडा केला. छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यातून येणा-या विजेच्या लाइनसाठी टॉवर उभारणीचं काम सध्या सुरू आहे. 

शेतक-यांचा विरोध

पण हे काम करण्यासाठी हजारो हेक्टर उभ्या शेतजमिनीतून पीक तुडवत काम सुरु आहे. शेतक-यांचा विरोध असतानाही कंपन्या दहशतीनं काम करत असल्यानं अखेर आमदार बाळू धानोरकर यांनी शिवसेना स्टाइल दणका दिला.