विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर

 राज्यातील ५ विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर 

Updated: Nov 2, 2020, 06:08 PM IST
विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर title=

दीपक भातुसे, मुंबई : राज्यातील ५ विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पाचही जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जुलै महिन्यात या जागांची मुदत संपली होती. मात्र कोरानामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

राज्यात भाजप पुढचं आव्हान वाढणार आहे. कारण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन्ही पक्ष एकत्र आल्याने समीकरणं बदलली आहेत. 

विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील रिक्त 5 जागांसाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. या निवडणुकीची अधिसूचना 5 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार असून 12 नोव्हेंबर पर्यंत अर्ज स्वीकृती होणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी 13 नोव्हेंबरला तर अर्ज मागे घेण्याची मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे आणि पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाळ संपला आहे. दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघाचे तत्कालिन आमदार चंद्रकांत पाटील हे कोथरूड मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेल्याने ही जागा देखील रिक्त झाली होती.