शासनाच्या जाचक अटीमुळे ठाण्यातील वृद्धेचा उपचाराअभावी मृत्यू

कोरोनामुळे इतर रुग्णांचाही जीव धोक्यात आला आहे. अशीच एक घटना ठाण्यात घडली. 

Updated: May 28, 2020, 02:46 PM IST
शासनाच्या जाचक अटीमुळे ठाण्यातील वृद्धेचा उपचाराअभावी मृत्यू title=
प्रतिकात्मक छाया

ठाणे : कोरोनामुळे इतर रुग्णांचाही जीव धोक्यात आला. ठाण्यातील मीना कोदे यांचा उपचारा अभावी मृत्यू झाला. त्या ६५ वर्षांच्या होत्या. मीना कोदे गेली ६ वर्ष अर्धांगवायुमुळे अंथरुणाला खिळून होत्या.  त्याचबरोबर त्यांना मधुमेह होता. १८मे रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. 

त्याची कोरोनची तपासणी करण्यात आली, मात्र त्यांचा रिपोर्ट येईपर्यंत डॉक्टरांनी त्यांना दवाखान्यात दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. शासनाच्या जाचक अटींमुळेच त्यांचा जीव गेल्याचा आरोप मीना कोदे यांच्या मुलीन केला आहे. 

दरम्यान, ठाण्याजवळील मुंब्रा इथे कोरोनाचा वेगान प्रसार झाला आहे. त्यामुळे पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी मुंब्रामध्ये बेमुदत काळासाठी कडकडीत लॉकडाऊन घोषित केला आहे.  अत्यावश्यक सेवा म्हणून सूट देण्यात आलेली किराणा, भाजीपाला दुकानेही लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे बंद राहणार आहेत. याकाळात गैरसोय होऊ नये यासाठी किराणा, भाजीपालासह मासळी, चिकन, मटण घरपोच देण्यास मुभा देण्यात आली आहे. 

तर दुसरीकडे हाताला काम नाही, खायला अन्न नाही, त्यामुळे मूळ गावी जाण्याच ओढ मजुरांना लागलेली दिसून येत आहे. यासाठी ते अनेक मजूर नाक्यावर वाहनांची वाट पाहत उभे राहात आहेत. यामध्ये सोशल डिस्टंनिगचा पार फज्जा उडालेला दिसून येत आहे.