जळगाव : चौकशीच्या नावाखाली मंत्रिपद तर दूरच स्वस्थ झोपूही दिलं जात नाही. त्यामुळे आपण अस्वस्थ आहोत अशी खंत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीतच, एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा स्वकीयांवर निशाणा साधला.
आपण इतरांसारखं क्लिन चिटवाला नाही तर चौकशीवाला माणूस असल्याचं सांगत, खडसेंनी मुख्यमंत्र्यांनाही यावेळी टोला लगावला. तर दानवे यांनी खडसेंच्या मंत्रिमंडळ वापसीच्या विषयावर बोलणं टाळलं.