नंदूरबार : ईद निमित्त सुट्टी असल्याने विरचक धरणात पोहण्यासाठी गेलेल्या आठ तरुणांपैकी चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. ईदची सुट्टी असल्याने हे तरुण पोहोण्यासाठी विरचक धरणात उतरले होते. त्यापैकी चारजणांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. मित्र बुडत असल्याचे लक्षात येताच काही मुलांनी आरडाओरडा केली. यावेळी मदतीसाठी स्थानिक धावले. त्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, त्यांना यश आले नाही. पोलीस आणि गावकऱ्यांनी या चौघांना पाण्याबाहेर काढले. त्यांना उपचारासाठी नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नंदूरबार शहरातील काळी मज्जिद परिसरातले रेहान शेख साकिद, नुर महोमद मजिद सिद्धीकी, मोहमद आता महोमद रिजवान, हूनेन शेख खलिल पटवा ही चार मुले विरचक धरणात पोहताना बुडालीत. ईदची सुट्टी असल्यामुळे ही चारही मुले धरणात उतरली होती. धरणाचे पाणी आटल्यामुळे तिथे गाळ प्रचंड होता. त्याच गाळाच्या पाण्यात ही मुले रुतल्याची प्राथमिक आहे. पोहोणारी मित्र दिसत नसल्याने आजुबाजूच्या मित्रांसह काहीनी आरडाओरडा केला. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला.
स्थानिक नागरिकांनी धरणात त्यांचा शोध सुरू केला आणि अवघ्या काही वेळात त्यांना बाहेर काढण्यात आले. जिल्हा रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली. या घटनेमुळे नंदुरबार शहरात शोककळा पसरली आहे. उत्सवाच्या दिवशी या चारही मुलांच्या मृत्यूने ईद सणावर दुःखाचे सावट पसरले.