भावना गवळी यांना बुलावा आया.... हजर न राहिल्यात ED हा वॉरंट काढण्याची शक्यता

Bhavana Gawali ED Summons : शिवसेना (Shiv Sena) खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या अनेक दिवसांपासून EDच्या रडारावर आहेत. त्यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावले आहे.  

Updated: Apr 29, 2022, 10:08 AM IST
भावना गवळी यांना बुलावा आया.... हजर न राहिल्यात ED हा वॉरंट काढण्याची शक्यता  title=

मुंबई : Bhavana Gawali ED Summons : शिवसेना (Shiv Sena) खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या अनेक दिवसांपासून EDच्या रडारावर आहेत. त्यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावले आहे. पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर गवळी या चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता आहे. 

भावना गवळी यांच्यावर भाजपकडून 100 कोटी रुपयांचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील (Mahila Utkarsh Pratishthan) मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. 

भावना गवळी या यवतमाळच्या शिवसेना खासदार  आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या पाच संस्थांवर ईडीने काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. त्याआधी भाजपने भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. 

EDच्या या कारवाईवर बोलताना भाजपने जुलमी सत्र सुरु केले आहे. माझी आणि माझ्या संस्थांची काय चौकशी करायची ती करा. पण शिवसेना हा अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे. आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही, असे भावना गवळी कारवाईनंतर म्हणाल्या होत्या. माझी चौकशी करताय तर वाशिम जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची पण चौकशी करा, अशी मागणीही त्यावेळी भावना गवळी यांनी केली होती.