पुणे : गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे. मनी लॉंड्री़ग प्रकरणी एडी ने डीएसके ग्रुपची ही मालमत्ता जप्त केली आहे. यात जमीनी, फ्लॅट, एलआयसी पॉलिसी, बँकेतील ठेवींचा समावेश आहे. ३५००० गुंतवणुकदारांची ११२९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीची कारवाई केली.
डी. एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा दीपक कुलकर्णी यांनी आठ कंपन्या स्थापन करून गुंतवणुकदारांकडून विविध योजनांखाली ठेवी घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.