डहाणूत दूग्ध प्रकल्प युनिटमध्ये ड्रग्स साठा

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या दापचरी दूग्ध  प्रकल्पातील युनिटमधून एफ एन ड्रीन ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आलाय. पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि तलासरी पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आलेय.

Updated: Oct 4, 2017, 08:45 AM IST
डहाणूत दूग्ध प्रकल्प युनिटमध्ये ड्रग्स साठा title=

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या दापचरी दूग्ध  प्रकल्पातील युनिटमधून एफ एन ड्रीन ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आलाय. पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि तलासरी पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आलेय.

दापचरी दूग्ध प्रकल्पामधील एका युनिटमध्ये असलेल्या घराच्यापाठी मागील गोठ्यात ड्रग्स बनविण्यासाठी लागणारे साहित्य, मशीन, केमिकल, पावडर असल्याचे आढळून आले. नालासोपरामध्ये अटकेत असलेल्या आरोपीने याबाबत माहिती दिली असता पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ व त्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.

दापचरी दूग्ध प्रकल्पापासून मुंबई, गुजरात राज्य तसेच केंद्र शासित प्रदेश जवळ असल्याने हा अमली पदार्थांचा साठा या भागात पुरविण्यात येत होता का याचा तापस देखील पोलीस करत आहेत. मात्र किती किमतीचा हा अमली पदार्थांचा साठा आहे याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून देण्यात आलेली नाही.