अहमदनगर - मनमाड मार्गावर एसटी-कार अपघातात कार जळून खाक

मनमाडरोडवर बाबळेश्वरजवळ एस टी आणि कार यांच्यात धडक होऊन अपघात झाला. या अपघात कारने उलट्या दिशेने येत धडक दिली. या अपघातात कारने पेट घेतला. या अपघातात कार जळून खाक झाली. कारमधील जखमींवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Updated: Oct 4, 2017, 08:09 AM IST
अहमदनगर - मनमाड मार्गावर एसटी-कार अपघातात कार जळून खाक title=

अहमदनगर : मनमाडरोडवर बाबळेश्वरजवळ एस टी आणि कार यांच्यात धडक होऊन अपघात झाला. या अपघात कारने उलट्या दिशेने येत धडक दिली. या अपघातात कारने पेट घेतला. या अपघातात कार जळून खाक झाली. कारमधील जखमींवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अहमदनगर-मनमाड मार्गावर हॉटेल प्रशांत जवळ नाशिकहून सोलापुरला चालेल्या एस टीला एका मारुती कारने समोरुन धडक दिली आहे. एस टी चालकाने लाईट अपर डिपर करत गाडी चालकाला सावध करण्याचा प्रयत्नही केला. मात्र कारचा वेग जास्त होता. त्याचवेळी एस टीच्या मागून आणखी एक गाडी आल्याने रस्त्यावर विरुध्द दिशेने येणाऱ्या  मारुती कारने एस टीला धडक दिली.

या अपघातानंतर इको गाडीने लगेच पेट घेतला. ही कारमधील गॅसने पेट घेतल्याने मोठा भडका उडाला. राहाता पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत. तोपर्यंत कार जळून बेचिराख झाली. कारमधील प्रवाशांनी दरावाजे उघडत बाहेर पडलेत. कार चालकाला एसटीचालकाने बाहेर काढले. या अपघातातील जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.