अकोला : भाच्याचा हत्येनंतर मामाकडून आत्महत्येचा बनाव; पोलिसांनी उघड केला गुन्हा

सुरुवातीला आत्महत्या वाटत असलेल्या असलेल्या या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे

Updated: Jul 28, 2022, 03:38 PM IST
अकोला : भाच्याचा हत्येनंतर मामाकडून आत्महत्येचा बनाव; पोलिसांनी उघड केला गुन्हा title=

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : मामानेच भाच्याच्या खून (Uncle Killed Nephew) केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात (Akola) उघड झाला आहे. सुरुवातीला आत्महत्या वाटत असलेल्या असलेल्या या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर ही हत्या असल्याचे उघड झाले आहे.

अकोला शहरातील अकोट फाईल पोलीस ठाणे अंतर्गत राहणारा 23 वर्षीय शेख अकबर शेख याने 25 जुलै रोजी फाशी घेवून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांना आत्महत्या केलेल्या तरुणाच्या मृत्यूबाबत शंका आली. त्यानंतर पोलिसांनी खोलात जात तपास केल्यानंतर सत्य समोर आलं आहे.

पोलिसांच्या तपासानंतर भाच्याच्या व्यसनाधीनतेला कंटाळून मामानेच त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भाच्याने आत्महत्या केल्याचा बनाव मामाने केला. मात्र, पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी अधिक तपास केला आणि ही खूनाची घटना उघडकीस आली.  या प्रकरणी आरोपी मामाला अटक करण्यात आली.

अकबर हा व्यसनाधीन झाला होता. त्याच्या व्यसनामुळे तो कुटुंबीयांसाठी आणि नातेवाईकांसाठी तो डोकेदुखी ठरत होता. अकबरचा काटा काढण्यासाठी त्याचा मामा शेख अमीन शेख इकबालने त्याची गळा आवळून हत्या केली. मात्र अमीन शेखने सायंकाळी अकबरने आत्महत्या केल्याचा बनाव केला आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तपास चक्रे फिरवून आरोपी मामाला अटक केली.