रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डोंबिवलीचं एम्स रुग्णालय फोडलं

डोंबिवलीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घालून रुग्णालयाची तोडफोड केली.

Updated: Jan 7, 2018, 07:30 PM IST
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डोंबिवलीचं एम्स रुग्णालय फोडलं  title=

डोंबिवली : डोंबिवलीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घालून रुग्णालयाची तोडफोड केली. डोंबिवली जवळच्या निळजे गावातील नीलम पाटील या तरुणीला निमोनिया झाल्याने तिच्यावर डोंबिवलीतल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र नीलम पाटीलचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

संतप्त झालेल्या तिच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आणि कर्मचा-यांनाही मारहाण केली. या प्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.