डोंबिवली MIDC तील आग नेमकी कुठे लागली? 6 किमीपर्यंत आवाज, जवळचे शोरुमही खाक; जाणून घ्या सर्व अपडेट

Dombivali MIDC Blast: मेट्रो केमिकल कंपनीजवळ असलेल्या अंबर केमिकल कंपनीत ही आग लागल्याचे समोर आले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: May 23, 2024, 05:47 PM IST
डोंबिवली MIDC तील आग नेमकी कुठे लागली? 6 किमीपर्यंत आवाज, जवळचे शोरुमही खाक; जाणून घ्या सर्व अपडेट  title=
Dombivali MIDC Fire

Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीशण आग लागली आहे.  डोंबिवली पूर्वच्या सोनारपाडा येथील मेट्रो केमिकल कंपनीजवळ असलेल्या अमुदान कंपनीमध्ये स्फोट झालाय. या आगीमुळे परिसरात घबराहट पसरली आहे. याबद्दलचा सविस्तर तपशील जाणून घेऊया. 

आगीसंदर्भात एमआयडीसीने सविस्तर माहिती दिली आहे. दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी आग लागलीय...अंबर केमिकल कंपनी, मेट्रो कंपनी जवळ, एम.आय.डी.सी. फेज-०2, सोनारपाडा, डोंबिवली (पुर्व). या ठिकाणी डोंबिवली एम.आय.डी.सी. मध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. 

डोंबिवली एम आय डी सी मधील बाजूला आसलेल्या हुंडाई शोरूम ला आग लागली आहे. आजू बाजूच्या राहणाऱ्या नागरिकांन सुरक्षा स्थळी हलवण्यात आले आहे. यामध्ये 30 ते 40 लोक जखमी  असून त्यांना डोंबिवलीच्या एम्स मध्ये दाखल करण्यात आले आहे. 

या स्फोटात 5 ते 6 कर्मचारी यांना दुखापत झालीय...स्फोटामुळे अनेक वाहनांचे आणि अनेक घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालीय...सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. डोंबिवली एम.आय.डी.सी. अग्निशमन केंद्रातून यासंदर्भात अपडेट देण्यात येत आहे. 

घटनास्थळी स्फोटामुळे अनेक वाहनांचे आणि अनेक घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
मे. मेट्रोपॉलिटन कंपनी, मे. के.जी. कंपनी, मे. अंबर केमिकल कंपनी इत्यादी कंपनीमध्ये भीषण आग लागली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

घटनास्थळी उपस्थित अग्निशमन दलाची वाहने उपस्थित आहेत. त्यामध्ये एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान ०२-फायर वाहनासह,  डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह, कल्याण (पु.) अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह, कल्याण (प.) अग्निशमन दलाचे जवान ०२-फायर वाहनासह,  पलावा एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह आणि ठाणे अग्निशमन दलाचे जवान ०१-हायराईज फायर वाहनासह उपस्थित आहेत.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवीण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

फडणवीसांची प्रतिक्रिया 

या आगीच्या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे.8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.