'एसटी भरती प्रक्रियेत माझ्यासह कुणाचाही वशिला चालणार नाही'

एसटीमध्ये चालक आणि वाहकपदासाठी येत्या 2 जुलैला लेखी परीक्षा होणार आहे.

Updated: Jun 29, 2017, 09:17 PM IST
'एसटी भरती प्रक्रियेत माझ्यासह कुणाचाही वशिला चालणार नाही' title=

मुंबई : एसटीमध्ये चालक आणि वाहकपदासाठी येत्या 2 जुलैला लेखी परीक्षा होणार आहे. या भरती प्रक्रियेत अगदी माझ्यासह कुणाचाही वशिला चालणार नाही, अशी स्पष्ट तंबीच परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिलीय.

कोकणातील 7 हजार 929 पदं भरण्यासाठी सुमारे 28 हजार 314 अर्ज आलेत. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील 27 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

अत्यंत पारदर्शक पद्धतीनं ही परीक्षा आणि भरती होणार असून, कुणीही आर्थिक देवाण-घेवाणीमध्ये अडकू नये. उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता प्रामाणिकपणं अभ्यास करून परीक्षा द्यावी, असं आवाहन रावते यांनी केलंय.