मुंबई : Maharashtra Political Crisis : आता वेळ निघून गेली. सामना करायचा असेल तर मुंबईत या असे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले आहे. महाविकास आघाडी अडीच वर्षे पूर्ण करणार असा दावा राऊत यांनी केला आहे. बंडखोर आमदारांच्या निष्ठेची कसोटी लागणार आहे. कायद्याची, कागदोपत्री आणि रस्त्यावरील लढाई आम्हीच जिंकणार, असा विश्वास संजय राऊत यांनी केला आहे.
आता आमची वेळ त्यांची वेळ संपली आहे. विधानभवनात महाविकास आघाडी बहुमत सिध्द करेल. पुढची अडीच वर्ष सरकार पूर्ण करेल आणि निवडूनही येणार आहे. आम्ही हार मानणार नाही, असे म्हणत राऊत यांनी बंडखोरांना आव्हान दिले आहे. महाविकास आघाडी सरकार मजबूत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या मागणीच्या विचार करु. शिंदे गटातील आमदारांनी 24 तासांत परत यावे, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल केले होते. संजय राऊत यांच्या वक्तव्याने राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आत्ताची या क्षणाची मोठी राजकीय घडामोडी. सत्तापेचात शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना विधीमंडळ गट नेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनील प्रभु असणार आहे. विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यास मान्यता दिली आहे.
शिवसेना विधीमंडळ गट नेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनील प्रभु यांची मान्यता विधीमंडळाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विधान सभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मान्यता दिली. गट नेते एकनाथ शिंदे यांनी गट नेते पद दावा केला होता. आता नियमानुसार चौधरी यांची विधीमंडळात नोंद केल्याची माहिती आहे. आता शिंदे यांना पुढील भूमिकेसाठी न्यायालयात दाद घ्यावी लागेल.