जेजुरी: नवविवाहितांना मिळणार खंडेरायाची थेट भेट

अवघा महाराष्ट्रच नव्हे तर, देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजूरीच्या खंडेरायांच्या भक्तांसाठी खूशखबर आहे. खास करून ही खूशखबर नवविवाहीत आणि विवाह करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 22, 2018, 11:46 PM IST
जेजुरी: नवविवाहितांना मिळणार खंडेरायाची थेट भेट title=

जेजुरी : अवघा महाराष्ट्रच नव्हे तर, देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या खंडेरायांच्या भक्तांसाठी खूशखबर आहे. खास करून ही खूशखबर नवविवाहीत आणि विवाह करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी आहे. विवाह करून खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी जेजुरीला येणाऱ्या जोडप्यांना आता रांगेत उभा राहण्याची गरज नाही. अशा जोडप्यांची आता खंडेरायाशी थेट भेट होणार आहे.

जेजुरीच्या खंडोबाला नवविवाहित जोडप्यानं दर्शन घेण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. आपल्या अर्धांगिनीला उचलून घेऊन जेजुरीच्या उंच पायऱ्या चढण्याची परंपरा जपली जात आहे. श्रद्धास्थान असलेल्या खंडेरायाच्या साक्षीनं संसाराची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या नवरदेवाला जेजुरी मंदिर व्यवस्थापनानं अनोखी भेट दिली आहे.खंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या नवविवाहित जोडप्याला थेट मंदिरात प्रवेश देत दर्शन घेण्याची सोय, मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नववधूनची खणा-नारळानं ओटीही भरली जाणार आहे.

आजपर्यंताच इतिहास पाहता नवदाम्पत्य खंडेरायाच्या दर्शनासाठी येत असत. तेव्हा, या दाम्पत्यास सर्वसामान्य भक्तांप्रमाणे रांगेत उभा राहून दर्शन घ्यावे लागत असे. पण, मंदिर व्यवस्थापणाच्या निर्णयामुळे आता रांगेत उभा राहण्याची गरज नवदाम्पत्याला भासणार नाही.