मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे. देशभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रेशन होत असतानाच माहुली गडावर देखील अनोख्या पद्धतीने नववर्षाचं स्वागत करण्यात आलं.
शंभुदुर्ग प्रतिष्ठाणच्यावतीनं यंदा अनोख्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे. यंदा ठाणे जिल्ह्यातील माहुली गडावरील शिवकालीन वस्तूंची स्वच्छता, दिशादर्शक फलक बसवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील माहुली हा सर्वात उंच गड असल्यामुळे याठिकाणी भगवा ध्वज फडकवण्यात आला. या मोहिमेत मोठ्या संख्येनं युवक सहभागी झाले होते.
नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी हौशी पर्यटक माहुली किल्ल्यावर येतात. दारू पिऊन तरूण मोठ्या आवाजात गाणी लावून धांगडधिंगा घालतात. यामध्ये अपघातही होतात. तसेच गड परिसरात कचरा टाकून जात असल्याने गडाचं पावित्र्यही नष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी पर्यटकांना माहुली किल्ल्यावर जाण्यास वनविभागाने बंदी घातली होती.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहापुरच्या वन्यजीव विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने एक दिवस किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे वन्यजीवांना मात्र मोकळा श्वास घेता आल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने शहापुरचा वन्यजीव विभाग पहारा दिला होता.
वन्य प्राण्यांना मुक्त संचार करण्यासाठी तानसा अभयारण्यात ऐतिहासिक माहुली किल्ली आहे. या ठिकाणी पर्यटकांसह गिर्यारोहकांची देखील रेलचेल असते. थर्टीफस्ट सेलिब्रेशनकरता मुंबईसह अनेक ठिकाणाहून लोक येत असतात. यामुळे किल्ल्यावर किंवा पायथ्याशी लोकांची गर्दी असते. यामुळे किल्ल्याच नुकसाना होताना पाहायला मिळतं. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं सांगणयात येत आहे.