Dhule Dam Leakage : धुळे जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आमळी शिवारातील काबऱ्या खडक धरण फुटण्याची शक्यता आहे. यामुळे धरणाच्या आसपासच्या गावांमधील ग्रामस्थांमध्ये दहसत पसरली आहे. खबदारी म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणाच्या पायथ्याचा काही भाग खचला आहे. त्यामुळे धरणातून गळती सुरु झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून धरणाच्या सांडव्याची दुरुस्ती सुरू होती. हे काम अर्धवट केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान खबरदारीच्या उपाययोजना म्हणून परिसरातील नागरिकांना सतरतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील मालंनगाव मध्यम प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे साक्री तालुक्यातून वाहणाऱ्या कान नदीमध्ये आता पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत आहे. कान नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह होणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रामध्ये कुणीही आपली जनावरे घेऊन न जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना करण्यात आले आहे, पुढील काही तास कान नदीमध्ये हा पाण्याचा विसर्ग अशाच प्रकारे सुरू राहणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
सोलापूर माळशिरस तालुक्याच्या नीरा नदीवरील बंधा-याचा भराव वाहून गेला... वीर धरणातून नीरा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे हा भराव वाहून गेलाय.. शासनानं काही दिवसांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून बंधाऱ्यावरील भराव आणि रस्त्याचं काम केलं होतं.... मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा भराव वाहून गेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे गणेश इंगळे यांनी केलाय... तसंच संबधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाईची मागणीही त्यांनी केलीये...
नीरा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या पावसामुळे वीर धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. वीर धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आलं...यामुळे पंढरपूर शहराजवळचा ब्रिटिश कालीन जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय. दरम्यान प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय...