धनंजय मुंडे यांनी लग्नात असा ठेका धरला, व्हिडिओ होतोय व्हायरल

Dhananjay Munde wedding dance  भाचीच्या लग्नात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा जलवा पाहायला मिळाला. 

Updated: Feb 8, 2022, 03:41 PM IST
धनंजय मुंडे यांनी लग्नात असा ठेका धरला, व्हिडिओ होतोय व्हायरल  title=
संग्रहित फोटो

लातूर : Dhananjay Munde wedding dance :लग्न समारंभात नेहमीच लगबग दिसून येते. अनेकांचे लग्न लक्ष वेधून घेतल्याचे आपण पाहिले आहे. तर काही लग्नात उत्साह आणि जोष दिसून येतो. असाच जोष भाचीच्या लग्नात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा दिसून आला. त्यांच्या डान्सचा जलवा पाहायला मिळाला. दिलखुलास अंदाज एका लग्नात धनंजय मुंडे यांना पाहायला मिळाले.

लग्नात नवरा नवरीसोबत वरातीत धनुभाऊ थिरकले. यावेळी त्यांच्या भन्नाट स्टेप्स पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केलाय. धनुभाऊंनी या लग्नात केलेला डान्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून बेभान होऊन धनंजय मुंडे लग्नाच्या वरातीचा आनंद घेताना दिसले आहेत.

मागच्या अनेक दिवसात पहिल्यांदाच भाचीच्या विवाह समारंभाच्या निमित्ताने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्रित पाहायला मिळाले. खरंतर अनेक वेळा हे बहीण भाऊ एका व्यासपीठावर पाहायला मिळाले. मात्र या लग्न सोहळ्यामध्ये जवळपास दोन तास पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्रित बसलेले दिसून आलेत.

मंत्री धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांची भाची चि. सौ. का. तेजश्री वामनराव केंद्रे आणि शरद सोनहीवरे यांचा विवाहसोहळा काल लातूर येथे पार पडला या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने धनंजय मुंडे, पंकजा मुंडे एकत्रित दिसून आले. यावेळी धनंजय मुंडे यांनी जोरदार डान्स केला. या डान्सचीच चर्चा सध्या सुरु आहे. मुंडे यांनी त्यांच्या भाचीच्या लग्नात ठेका धरला. त्यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

लातूर शहराजवळ असलेल्या हॉटेल कार्निव्हल या ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडला. धनंजय मुंडे यांच्या भाचीचा विवाह असल्यामुळे धनंजय मुंडे काल सकाळपासूनच उपस्थित होते.