साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर : शिवारावरुन आसमंताच्या भराऱ्या मारणारा मराठी सिनेमा आज प्रत्येकाला भुरळ घालतोय. पण ही भव्य दिव्य स्वप्नाच्या दुनिया केवळ श्रींमंतासाठीच आहे या विचारांना छेद दिलाय, जुन्नरच्या एका बळीराजाच्या मुलाने, कसलाही अनुभव नसताना.
विपरीत परिस्थीत धाप या चित्रपटांने चक्क पुरस्कारापर्यंत मजल मारली आहे. चित्रपट प्रदर्शनासाठी थांबलेल्या या गुणी कलावंताची ही पाठीवर थाप मारण्यासारखी कहाणी.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जुन्नर तालुक्यातलं हे निमगाव सावा नावाचं हे अगदी छोटस गाव.. प्रामुख्याने शेती या व्यवसायावर अवलंबून असणारी इथली ही कुटुंब...त्यातलच बबन गाडगे यांचं हे कुटुंब आपली 18 गुंठे पूर्वपरंपरागत शेती करणार.
योगेश हा त्यांचा मुलगा या शेतीवर मिळणाऱ्या उत्पन्नातून वेळप्रसंगी दुस-याच्या शेतात काम करून शाळा शिकला. त्यामुळे त्याने कुठेतरी नोकरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावावा असंच त्यांना वाटलं असेल. मात्र योगेशला लहानपणापासूनच रंगभूमीची आवड निर्माण झाली होती. याच अभिनयाच्याप्रेमापाय़ी कोणतंही प्रशिक्षण न घेता योगेशने अभिनेत्या पासून ते निर्मात्यापर्यत मजल मारली
सध्या तो पुणे शहरात मित्रांच्या रूममध्ये राहून त्याच चित्रपट निर्मितीच वेड पूर्ण करतो आहे. त्याने निर्मिती केलेल्या धाप या चित्रपटाला दिल्लीमधल्या प्रदर्शनात पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाची गीत पटकथा लिहण्यापासून ते या चित्रपटात मुख्य भूमिका निभावण्यापर्यंत सर्वच डोलारा योगेशने उचललाय.
योगेशने एवढं मोठं चित्रपट निर्मितीच केवळ स्वप्न नाही पाहिलं, तर त्यादृष्टीने रात्रंदिवस झटून कामही केल. त्यामुळेच आज त्याचा धाप हा चित्रपट कुठेतरी आर्थिक संकटात सापडून, प्रदर्शनापासून वंचित राहिला आहे.
मरठी चित्रपट आता कक्षा रुंदावतोय पण या बदलाच्या काळात गावकूसातील एका तरुणांनी पाहिलेलं हे सत्तर एमएमचे स्वप्न पूर्ण होण्यास आपणासारख्या अनेकांची गरज आहे.